Latest Marathi News

BREAKING NEWS

राशीभविष्य : आज दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ : कसा असेल तुमचा आजचा दिवस : जाणून घ्या सविस्तर….

0 746

मेष
आजचा दिवस मित्र व सामाजिक कार्ये ह्यांच्यासाठी धावपळ करण्यात जाईल. पैसा सुद्धा खर्च होईल. नवीन मित्रांच्या ओळखी होतील. भविष्यात त्यांचा उपयोग होईल. सरकारी कामे सफल होतील. मोठयांचा सहवास लाभेल, त्यांना भेटून आनंद होईल. दूर किंवा विदेशात असलेल्या संततीची काही आनंददायी बातमी मिळेल किंवा भेट होईल. अचानक धन लाभ संभवतो.
वृषभ
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विशेषतः व्यापार – व्यवसाय करणार्यांना आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे. नोकरीत पदोन्नती संभवते. कार्यालयात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख शांती मिळेल. मित्र भेटीतून आनंद मिळेल.
मिथुन
आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आज आपणास मानसिक व्यग्रता व शारीरिक शिथिलता अनुभवास येईल. काम करायला उत्साह वाटणार नाही. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांचे सहकार्य मिळणार नाही. पैसा खर्च होईल. संतती बरोबर मतभेद होतील किंवा त्यांच्या चिंतेत मन व्यग्र राहील.
कर्क
आज वैचारिक नकारात्मकता मनात असल्याने दिवसभर आपण अस्वस्थ राहाल. रागावर आज संयम ठेवावा लागेल. खर्च अधिक होईल. कुटुंबियांशी संघर्ष संभवतो. आज नवीन कामे सुरू करू नये. नवे परिचय सुद्धा लाभदायी होणार नाहीत. सरकार विरोधी कारवायां पासून दूर राहणे सुद्धा फायदेशीर ठरेल.
सिंह
आज पति – पत्नीत मतभेद होऊन कटुता निर्माण होईल. दोघां पैकी एकाचे स्वास्थ्य बिघडणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. सांसारिक किंवा इतर प्रश्नांमुळे मन उदास राहील. सामाजिक क्षेत्रात अपयशी व्हाल. भागीदारांशी सुद्धा मतभेद होऊ शकतात.
कन्या
आज नोकरी – व्यवसायात यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. सहकार्‍यांचे सहकार्य वाढेल. कुटुंबातील वातावरण सुखावह असेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल.
तूळ
आपली वैचारिक व मधुर वाणी लोकांना प्रभावित करेल व तसेच त्यामुळे इतर व्यक्तींशी संबंध दृढ होतील. चर्चा – वादविवाद ह्यात सुद्धा आपला प्रभाव राहील. कष्टाच्या मानाने यश संतोषजनक नसेल. कामात सांभाळूनच पुढे चला. आहाराकडे लक्ष द्या. साहित्य, लेखन ह्यात गोडी निर्माण होईल.
वृश्चिक
आज मित्रांशी सावधपणे वागावे लागेल. शारीरिक व मानसिक अस्वस्थता राहील. मातेचे स्वास्थ्य बिघडू शकते. धन व किर्तीची हानी होईल. कौटुंबिक वातावरण त्रासदायक राहील. मन प्रसन्न नसल्याने आज झोप सुद्धा होणार नाही.
धनु
आज आपण प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आजचा दिवस नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल आहे. मित्रांसह दिवस आनंदात घालवाल. आज आपल्या जीवनात आनंद ओसंडून वाहू लागेल. मित्र व स्नेही भेटल्यामुळे आनंदित व्हाल.
मकर
आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. कुटुंबियांशी गैरसमजातून मतभेदाचे प्रसंग घडल्याने मन दुःखी होईल. विनाकारण खर्च होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. शेअर्स मध्ये गुंतवणूक करू शकाल. गृहिणी आज असंतुष्ट राहतील. शांती मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
कुंभ
आजचा दिवस आपणास आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. मित्र व कुटुंबीय ह्यांच्यासह आनंदात दिवस घालवाल. प्रवास, सहल ह्यातून सुद्धा आज आनंद मिळवू शकता. आज विचारातील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करा.
मीन
स्थावर संपत्ती व कोर्ट – कचेरी ह्यांच्या पासून आज शक्यतो दूर राहा. मनाच्या एकाग्रतेमुळे सर्व कामात फायदा होईल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. स्वकीयांचा वियोग घडू शकतो. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. मिळणार्‍या फायदयात नुकसान होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. आर्थिक देवाण – घेवाणीचे निर्णय विचार पूर्वक घ्या. अपघात व गैरसमज ह्यापासून दूरच राहा.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!