मंगळवेढा : एकाच घरातील तीन महिलांच्या खून सत्रामुळे मंगळवेढा तालुका हादरला आहे. तालुक्यातील नंदेश्वर येथे तीन महिलांची दुपारच्या सुमारास अमानुषपाने हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नंदेश्वर गावामध्ये दुपारी एकच्या दरम्यान अज्ञात इसमाने दिपाली बाळू माळी (वय-25), संगीता महादेव माळी (वय-50), पाराबाई बाबाजी माळी (वय-45) या तीन महिलांचा राहत्या घरासमोर हत्याराच्या साह्याने त्यांचा खून केला. या घटनेने नंदेश्वरात खळबळ उडाली असून, पोलीस निरीक्षक रणजीत माने घटनास्थळी भेट दिली असून आरोपींचा शोध सुरु असून एका संशयितास ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
