नवीन मुंबई : पनवेल शहरातील बारावी इयत्तेत शिकणाऱ्या सतरा वर्षीय विद्यार्थ्याने 20 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी अभ्यासाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
पनवेल शहरातील देवदर्शन सोसायटीत राहणारा 17 वर्षीय विद्यार्थी बाहेरून बारावीला बसला होता. 20 फेब्रुवारी रोजी त्याने राहत्या घरात फॅनला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे आई वडील बाहेर गेले होते. ते घरी आले त्यावेळेस त्यांना दरवाजा बंद दिसला. त्यांनी लॅचच्या साह्याने दरवाजा उघडला. यावेळी मुलाचा मृतदेह फॅनला लटकलेल्या अवस्थेत दिसला.
