Latest Marathi News

BREAKING NEWS

राशीभविष्य : आज दिनांक २१ फेब्रुवारी २०२३ : कसा असेल तुमचा आजचा दिवस : जाणून घ्या सविस्तर

0 709

मेष
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. स्नेही, स्वकीय व मित्रांसह सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मित्रांकडून लाभ होतील. त्यांच्यासाठी पैसा सुद्धा खर्च करावा लागेल. वडीलधारी व स्नेहीजन ह्यांच्याशी संपर्क होऊन काही व्यवहार वाढतील. एखाद्या रम्य स्थळी सहलीस जाण्याचा बेत आखू शकाल. अचानक धनलाभ संभवतो. संतती कडून एखाद्या लाभाची अपेक्षा बाळगू शकता.
वृषभ
आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. नवीन कामाच्या योजना यशस्वीपणे आखू शकाल. नोकरी – व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. अपूर्ण कामे तडीस जातील. बढती मिळून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरात वर्चस्व राहील व आपलेपणा वाढेल. भेटवस्तू व मान – सन्मान प्राप्त झाल्याने मन प्रसन्न होईल.
मिथुन
मानसिक दृष्टया आजचा दिवस द्विधा अवस्था व कटकटीचा राहील. शरीराने थकाल व आळसामुळे कामात उत्साह वाटणार नाही. पोटदुखीचा त्रास संभवतो. पैसा खर्च होईल. व्यवसायात अडचणी येतील. सहकारी सहकार्य करणार नाहीत. संततीची काळजी राहील. राजकीय अडचणी त्रास देतील. आज नवीन कार्यारंभ न करणे हितावह राहील. प्रतिस्पर्ध्यांशी शक्यतो वाद टाळावेत.
कर्क
आज प्रत्येक गोष्टीत जपून व्यवहार करावा लागेल. कुटुंबियांशी वाद संभवतात. वाणी व संतापावर नियंत्रण ठेवल्यास संभाव्य कटुता टाळू शकेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. अवैध कामां पासून शक्य तितके दूर राहावे.
सिंह
आज वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची सुद्धा शक्यता आहे. भागीदार व व्यापारी ह्यांच्याशी शांतपणे व्यवहार करावा. शक्यतो निरर्थक चर्चा किंवा वाद ह्यापासून दूर राहावे. कोर्ट- कचेरीच्या कामात फारसे यश मिळणार नाही. सामाजिक क्षेत्रात यश मिळणार नाही.
कन्या
आज उत्साह व स्वास्थ्य उत्तम राहील. घरी व नोकरीच्या ठिकाणी वातावरण आनंदी राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल. स्त्रीयांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. कार्यात यशस्वी व्हाल. अपेक्षेपेक्षा जास्त खर्च होईल.
तूळ
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. संततीची काळजी सतावेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील. वाद – विवाद, बौद्धिक चर्चा ह्यापासून शक्यतो दूर राहावे. आज सुरू केलेले काम पूर्ण होऊ शकणार नाही. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. एखादी मानहानी संभवते. शक्यतो प्रवास टाळावेत.
वृश्चिक
आजचा दिवस शक्य तितक्या शांतचित्ताने घालवावा. चिंतातुर मन व अस्वस्थ शरीर ह्याचा आपणास त्रास होईल. संबंधीतांशी मतभेद संभवतात. आर्थिक हानीची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारचे दस्तावेज काळजीपूर्वक करावेत.
धनु
आजचा दिवस नव कार्यारंभास शुभ फलदायी आहे. भावंडांशी सलोखा वाढेल. तसेच कुटुंबीयांसह प्रवासाचे बेत ठरवाल. आरोग्य उत्तम राहील. नशिबाची साथ लाभेल. गूढ विषयांची गोडी वाटेल. आज कार्यसिद्धीचा दिवस आहे. सामाजिक मान – सन्मान होतील.
मकर
आज कुटुंबियांशी वाद होण्याची शक्यता आहे. बोलण्यातील संयमच आपणाला वादातून बाहेर काढेल. सट्टे बाजारात गुंतवणूक करण्याचे नियोजन कराल. प्रकृती साधारणच असेल. डोळ्यांचा त्रास संभवतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्यावे.
कुंभ
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी राहाल. व्यावहारिक अनुभव चांगले येतील. कुटुंबीयांसह प्रवासाचा व स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्याल. मिळालेच्या भेट वस्तूंमुळे आनंदी राहाल. आपल्या मनास स्पर्श करणारे विचार ऐकिवात येतील.
मीन
आज अतीलोभ व हव्यास ह्यात आपण फसण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार सावधपणे करावेत. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. प्रकृती बिघडू शकते. मनाची एकाग्रता होणार नाही. मांगलिक कार्यावर पैसा खर्च होईल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!