माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी : येथील महात्मा फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये कै. रामराव सातारकर सत्ताधारी पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळविला. तर विरोधी माजी उपसभापती अशोक माळी यांच्यासह त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाला.
आटपाडी शहरातील महात्मा फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक लागली होती. सुरुवातीला बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरु होत्या. परंतु यामध्ये सत्ताधारी व विरोधक यांना कोणतेही यश आले नसल्याने निवडणूक लागली होती. संस्थेसाठी काल दिनांक १९ रोजी मतदान व मतमोजणी संपन्न झाली. यामध्ये सत्ताधारी कै. रामराव सातारकर सत्ताधारी पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळविला.

विजयी उमेदवारांमध्ये पंढरीनाथ नागणे, प्रकाश गावंदरे, दिलीप जाधव, दिलीप पाटील, रघुनाथ सागर, राजेश सातारकर, विलासराव सातारकर, कुसुम फुले, महानंदा सातारकर यांनी विजय मिळविला. तर प्रभाकर पुजारी व सीताराम लांडगे हे संचालक बिनविरोध निवडून आले होते. विजयानंतर विजयी उमेदवारांनी फटाक्यांची आतषबाजी करत मिरवणूक काढली.