आटपाडी : करगणीत भरणार जनावरांची यात्रा : प्रशासनाने दिली परवानगी : शेतकऱ्यांना ‘या’ बाबींची करावी लागणार पूर्तता
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील करगणी येथील लखमेश्वर देवाची जनावरांची यात्रा उद्या दिनांक २० पासून भरण्यास प्रशासनाने परवानगी दिली असली तरी ज्या शेतकऱ्यांना या यात्रेमध्ये सहभागी व्हायचे आणि त्यांना प्रशासनाने दिलेल्या नियम व अटींची पूर्तता करावी लागणार आहे.
करगणी येथे सालाबाद प्रमाणे लखमेश्वर देवाची यात्रा भरत असून यावेळी जनावरांची देखील मोठी यात्र भरत असते. परंतु लंम्पी रोगाच्या प्रादुर्भावमुळे या वर्षी जनावरांची यात्रा भरणार की नाही अशी साशंकता निर्माण झाली होती. याबाबत करगणी ग्रामपंचायत कडून देखील प्रशासनाला पत्र देण्यात आले होते.

त्यानुसार आटपाडी बाजार समितीने जिल्हाधिकारी यांच्याकडे सदर यात्रेबाबत परवानगी मागितली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी अटी व शर्ती घालून यात्रेस परवनगी दिली आहे. यामध्ये यात्रेमध्ये भाग घेवू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी आवश्यक पूर्तता शेतकऱ्यांचे आधारकार्ड, जनावरांच्या कानातील बिल्ला, लम्पी प्रतिबंधक लसीकरण एक महिन्यापूर्वी केलेचा पशुवैद्यकीय अधिका-याचा दाखला, बाहेर गावावरुन येणाऱ्या जनावरांचा आरोग्य वहातूक दाखला सबंधीत पशुवैद्यकीय अधिकारी यांचा असणे बंधनकारक असून सदरची पूर्तता करणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे कागदपत्र पूर्तता करणे आवश्यक राहणार असून कागदपत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना यात्रेमध्ये प्रवेश दिला जाईल याची नोंद घ्यावी.असे आवाहन प्रशासन व यात्रा कमिटीव्दारे करणेत आले आहे.