Latest Marathi News

BREAKING NEWS

बेकायदेशीर मांसाची विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

0 20

मीरारोड : बेकायदा अज्ञात जनावराच्या मांसाची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी वाहनासह अटक केली आहे. तर सदर मांस त्यांनी कुठून आणले व कोणाला विक्री केले जाणार होते आदींचा तपास पोलीस करत आहेत. उपनिरीक्षक जगन्नाथ पडेलकर , हवालदार हौसराव आंधळे हे वरसावे पुलाच्या ठिकाणी बंदोबस्त साठी तैनात असताना पहाटेच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान एक पिकअप वाहन तपासणीसाठी बाजूला घेतले . त्या वाहनात ताडपत्री खाली झाकलेले कोणत्यातरी जनावराचे तुकडे सापडले .

काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून चालक वाजिद अली शेख (४२) रा . फातमा नगर , भिवंडी व साथीदार क्लिनर अहमदराजा सिद्दीकी (२३) रा . महाराजगंज ,उत्तरप्रदेश ह्या दोघांना ताब्यात घेतले . पोलिसांनी ५ लाख किमतीचे वाहन व २ लाख १५ हजारांचे मांस जप्त केले आहे . मीरारोडच्या नया नगर मधील लियाकत याने सदर मांस मागवले असल्याचे चालकाने सांगितल्यावर त्याचा शोध पोलीस घेत आहेत .

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!