नागपूर : वर्तमानात देशाच्या एकात्मतेचे सूत्र बळकट करण्यासाठी प्रांतीय भाषांमधील ज्ञान, साहित्याचा पुन्हा संस्कृतमध्ये अनुवाद होणे काळाची गरज आहे. असे झाले तर भारत विश्वगुरू बनेल असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मधुकर पेन्ना यांनी ज्ञानेश्वरीचा संस्कृतमध्ये अनुवाद केलाय. त्यानिमित्ताने बजाजनगरातील संत ज्ञानेश्वर सभागृहात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सरसंघचालक बोलत होते.
महात्मा गांधी म्हणायचे की, हिंदुत्व म्हणजे सत्याचा शोध असून तो सतत चालणारा आहे. आपल्याकडे थिअरी मांडत नसून तुम्ही स्वतः अनुभव घ्या असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचे भाष्य हजार ओव्यांचे झाले. परंतु कालौघात आपली गरज बदलली आहे.

संत साहित्य आणि पंथ साहित्य यात फरक आहे. संत साहित्य हे अनुभवातून येते विद्वत्तेतून येत नाही. वेदांतात न सुटणाऱ्या निरगाठी असू शकतात मात्र, संत साहित्यात निरगाठी नाहीत. कारण संत साहित्यात जे काही आहे ते प्रत्यक्ष आहे. संत साहित्य अनुभवातून आल्यामुळे सोपे असते.