सांगली : पगार वेळेत न मिळाल्याने आर्थिक विवंचनेतून कवठेमहांकाळ बस आगारातील चालक भीमराव सूर्यवंशी (रा. शिरढोण ता. कवठेमहांकाळ) यांनी आज (16 फेब्रुवारी) सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली.
भीमराव सूर्यवंशी हे एसटीमध्ये चालक पदावर काम करत होते. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर झाला नसल्याने आर्थिक विवंचनेतून हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे. मात्र, आत्महत्या मागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मृतदेह कवठेमहांकाळ शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला आहे.

दुसरीकडे, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य सरकारवर अवलंबून असलेल्या महामंडळाची अर्थ विभागाकडून कोंडी होताना दिसत असल्याचे चित्र आहे. अर्थ विभागाकडून आतापर्यंत सरकारनं दिलेल्या निधीचे विवरण सादर करण्याचे एसटी महामंडळास सांगितले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्यातील पगार रखडला असून आणखी काही काळ तो लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.