Latest Marathi News

BREAKING NEWS

कात्रज रस्त्यावरील सुधारणा करण्यासाठी महापालिकेने केली सुरवात

0 45

पुणे : सोलापूर सासवड या भागातून येणाऱ्या अवजड वाहनांना मुंबईला ये-जा करण्यासाठी पुणे शहरातून कात्रज कोंढवा रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे या रस्त्यावर कायम अवजड वाहनांची वाहतूक असते. हा सुमारे ३ किलोमीटरचा रस्ता ८४ मीटर रुंद करण्यात येणार होता. चार वर्षांपूर्वी त्याचे भूमिपूजनही झाले. पण जागा ताब्यात नसल्याने हा प्रकल्प अर्धवट राहिला आहे. ८४ मीटरचा रस्ता करण्यासाठी भूसंपादनासाठी सुमारे ७०० कोटी रुपये खर्च येणार होता. तेवढे पैसे महापालिकेकडे नाहीत.

त्यामुळे ५० मीटरचा रस्ता करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जागामालकांना नुकसानभरपाई देण्यासाठी २०० कोटी रुपये मिळणार आहेत. पण, ही प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. रुंदीकरणाचा प्रकल्प पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याने सध्या अस्तित्त्वात असलेल्या रस्त्यावर सुधारणा करण्यासाठी महापालिकेने सुरुवात केली आहे.

Manganga

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी कात्रज कोंढवा रस्त्याची पाहणी केली. त्यामध्ये तातडीच्या सुधारणा करण्यासाठी वाहतुकीत बदल करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. त्यातून काही महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत.शत्रुंजय मंदिर येथे ग्रेड सेक्टरचे काम पूर्ण करण्यासाठी वाहतूक वळवली जाणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!