मुंबई : वाशीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पाळणाघरातील महिला सेविकेनं अवघ्या १६ महिन्यांच्या चिमुकल्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आणि सर्वांना धक्का बसला. पाळणाघरातील घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडीस आला.
या चिमुकलीच्या वडिलांनी वाशी येथील स्मार्ट टॉट्स येथे घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज गेल्या बुधवारी ८ फेब्रुवारी रोजी नवी मुंबई पोलिसांसह संबंधित अधिकाऱ्यांना टॅग करून ट्विटरवर पोस्ट केली.

डे माझ्या १६ महिन्यांच्या बाळासोबत हे असं घडलं आहे. या महिला आणि डे केअरच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाला मारहाण करण्याचा कोणालाही अधिकार नाही.