पैठण : कडा येथील बाजार समितीमध्ये बुधवारी कांद्याचा लिलाव असल्याने खिळद येथील शेतकरी दुचाकीवर येत असताना पैठण-बारामती रोडवर भरधाव मालवाहु ट्रकने जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील दोघाचा जागीच मुत्यू झाल्याची घटना घडली आहे. बाबासाहेब गर्जे(वय ४५) आणि नारायण गोल्हार(वय ४३) असे मयतांची नावे आहेत.
आष्टी तालुक्यातील कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी कांद्याचा लिलाव असल्याने या लिलावासाठी खिळद येथील शेतकरी बाबासाहेब गर्जे व नारायण गोल्हार हे दुचाकी(क्रमांक M.H.16, B.F.9573) वरुन येत असताना पैठण बरामती रोडवर लोंखडाने भरलेला ट्रक क्रमांक( M.H.12, E.F. 3646) याने पाठीमागून जोरांची धडक दिल्याने दोघांचा जागीच मुत्यू झाला.

ट्रक चालकांने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मुत्यू झाला. एवढे होऊनही ट्रक चालकाने ट्रकखाली गुतलेली दुचाकी एक किलोमीटर अंतरावर ओढत नेल्याची घटना घडली. अखेर लोकांनी ट्रक आडवला. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत