नोएडा: बरौली गावात राहून अग्निवीर परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने परीक्षेत नापास झाल्यामुळे गळफास लावून आत्महत्या केली.
पोलिसांना मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट मिळाली असून त्यात त्याने लिहिले आहे ‘माझं स्वप्न मी सैनिक पूर्ण शकलो नाही. पण तू नक्की सैनिक हो आणि आई-वडिलांची काळजी घे.’ याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
पोलिसांनी सांगितलं की मृत 19 वर्षीय दीपू हा अलिगढचा रहिवासी आहे. त्याच्या मृतदेहाजवळ तीन पानी सुसाईड नोट सापडली असून त्यात त्यानं लिहिले ‘मी चार वर्षे खूप मेहनत केली. पण काहीही साध्य झालं नाही. मला माझ्या आई-वडिलांचं नाव मोठ करायचं होते. या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी मी नक्कीच सैनिक होईन. नुकतीच दीपूनं सैन्य भरतीची परीक्षा दिली होती. 30 जानेवारीला परीक्षेचा निकाल लागला, त्यात तो नापास झाला. त्यामुळं त्यानं हे टोकचं पाऊल उचललं. नोएडा झोनचे अतिरिक्त डीसीपी आशुतोष द्विवेदी यांनी सांगितलं की, अलिगढचा रहिवासी असलेला 19 वर्षीय दीपू लहान भाऊ अमन आणि मावशीचा मुलगा अंशूसोबत बरौलाला राहत होता. दीपू आणि त्याचा भाऊ नोएडामध्ये राहून सैन्यात भरतीची तयारी करत होते.
