Latest Marathi News

BREAKING NEWS

‘या’अभिनेत्याने दिले वेड च्या चाहत्यांना आणखी एक सरप्राईज

0 747

रितेश देशमुख व जिनिलिया देशमुख ‘वेड’ हा सिनेमा गेल्या ३० डिसेंबर प्रदर्शित झाला. तेव्हापासून या सिनेमानं जणू वेड लावले आहे. अद्यापही या सिनेमाची क्रेझ कमी झालेली नाही. ‘बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला, मात्र प्रेक्षकांनी एक नाराजीही व्यक्त केली होती. रितेश-जिनिलिया यांचं एकही रोमँटिक गाणं सिनेमात नसल्यामुळे प्रेक्षक नाराज होते.

रितेशने प्रेक्षकांची ही नाराजी लगेच दूर करत ‘वेड तुझा’ गाण्याचे सत्या-श्रावणी व्हर्जन प्रदर्शित केले. इतकंच नाही तर ते सिनेमाच्या एक्सटेंडेड व्हर्जनमध्ये समाविष्ट केलं. आता रितेश व जिनिलियाने ‘वेड’च्या चाहत्यांना आणखी एक सरप्राईज दिले आहे. काही तासांपूर्वी ‘सुख कळले’ या आणखी एका गाण्याचं नवं व्हर्जन रितेशने त्याच्या इन्स्टाअकाऊंटवर शेअर केलं आहे. सुख कळले’चं अजय गोगावले व्हर्जन रिलीज करण्यात आलं आहे.

Manganga

चित्रपटात श्रावणीचं एकतर्फी प्रेम दाखवणारं ‘सुख कळले’ हे गाणं तुफान हिट झाले. हे गाणं श्रेया घोषालने गायले होते. आता याच गाण्याचं नवं व्हर्जन मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा संगीतकार आणि गायक अजय गोगावलेच्या आवाजात ऐकायला मिळतेय. अजयच्या आवाजातील हे गाणंही चाहत्यांना प्रचंड आवडलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!