माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी पोलीस ठाणे येथे विविध गुन्हामध्ये फरारी असलेल्या आरोपीस आटपाडी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आटपाडी पोलिसात विविध गुन्हामध्ये आरोपी शाहरुख विजय पवार वय २९ रा. मापटेमळा, आटपाडी हा आरोपी पोलिसांना चकवा देत होता. परंतु पोलिसांनी त्यास सापळा रचून अटक केली. यावेळी त्याने आटपाडी पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यापैकी एका गुन्हाची कबुली दिली असून त्याने सदरची चोरी देवगुण विजय पवार याचे मदतीने केली असल्याची कबुली दिली आहे.

यामध्ये त्याने चोरी केलेली अर्धा तोळ्याची मणी मंगळसुत्र, २ ग्रॅम वजनाचे कानातील वेल तसेच २ ग्रॅम वजनाचे कानातील रिंगा इत्यादी मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पद्मा कदम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. मेमाणे, सपोनि वर्धन, पोलीस उपनिरीक्षक चोरमले त्यांच्यासह दादासाहेब ठोंबरे, विजय कदम, राकेश पाटील, विकास जाधव, शशिकांत गावडे, संतोष जाधव, शैलेंद्र कोरवी, नारायण गारळे, अशोक घोरपडे, विशाल सुखदरे, संपत आटपाडकर, देवानंद बोबडे, परशराम देशमुखे, दाजी तोरकड, तुकाराम ढाले यांनी केलेली आहे.