Latest Marathi News

BREAKING NEWS

दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात होऊन पाचजण जखमी तर एकजण ठार

0 51

खंडाळा : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून वाई तालुक्यातील सुरूर येथील धावजीबुवा येथे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांची खासगी गाडीला पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंडाळ्याजवळ आज मंगळवारी अपघात झाला. या अपघातात पिकअप जीप पलटी झाल्याने एकजण ठार झाला असून पाच भाविक जखमी झाले आहेत. राजेंद्र साबळे असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

 

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की श्रीगोंदा तालुक्यातील लोणी येथील काही भाविक वाई तालुक्यातील सुरूर येथील धावजीबुवा देवस्थानला दर्शनासाठी पिकअप जीप (एमएच १६ सीडी १४८८) मधून निघाले होते. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ते खंडाळ्याजवळ आले. तेव्हा भरधाव वाहनाला ओव्हरटेक करताना चालकाचा ताबा सुटल्याने पिकअप रस्त्याच्या बाजूला पलटी झाली.

Manganga

या अपघातात राजेंद्र साबळे (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर राधाबाई साबळे (६५), सुभद्रा साबळे (४५), सुनीता गायकवाड (४५), विजया साबळे (४८) यांसह पाचजण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. खंडाळा पोलिस तपास करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!