माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरातील सोमेश्वर नगर येथे बंद घराचा दरवाजा फोडून चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी अनिल नामदेव केंगार हे सोमेश्वर नगर येथे राहण्यास आहेत. दिनांक १२ च्या सकाळी सकाळी ७ ते सायंकाळी ५ च्या सुमारास त्यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील सोने व रोख रक्कम असे ३६ हजार रुपयांची चोरी केली.

याप्रकरणी आटपाडी पोलिसात अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४५४, ३८० नुसार गुन्हा दाखल झाला असून सदर घटनेचा अधिका तपास पोहेकॉ कदम हे करत आहेत.