माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : युवतीचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी आरोपी विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी ही तीच्या मावशीच्या घरी जात असताना आरोपी पप्पू चिलाप्पा लवटे ( रा. लोटेवाडी ता. सांगोला, जि. सोलापूर) याने मोटारसायकल वरून पाठीमागुन येवून फिर्यादी जवळ गाडी थांबवुन तु मला आवडते, मला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणाला. परंतु त्यावेळी फिर्यादीने त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही.
त्यानंतर पुन्हा आरोपीने फिर्यादी ही आटपाडी थेटर चौक येथे आली असता, पाठीमागुन मोटर सायकलने पाठलाग करत येवुन गाडी फिर्यादी जवळ थांबवुन, तु मला आवडते तु माझ्याशी लग्न कर असे म्हणुन फिर्यादी चा हात पकडुन मनास लजा उत्पन्न होइल असे कृत्य केले. तसेच लग्न न केल्यास खुन करण्याची धमकी दिली.
याप्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा अधिक तपास पोउपनिरीक्षक चोरमुले करीत आहेत.
