माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : दि. सांगली अॅनर्स सोसायटीचे माजी संचालक व पाटबंधारे पतसंस्था सांगलीचे माजी व्हाईस चेअरमन गोरखनाना नामदेव पाटील यांचे हृदयविकाराने आज आटपाडी येथे निधन झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघाचे ज्येष्ट नेते रावसाहेबकाका पाटील यांचे कनिष्ट बंधू आणि जि.प. प्राथमिक शाळा नं. २ शेटफळेच्या मुख्याधिपीका सुवर्णाताई पाटील यांचे गोरखनाना पाटील हे पती होते.

सहाच दिवसापूर्वी दि. ७ फेबुवारी रोजी त्यांच्या डॉक्टर कन्या प्रणाली यांचा विवाह शेकडो मान्यवर महोदयांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात आटपाडी येथील जवळे हॉल येथे संपन्न झाला होता. गोरखनानांच्या निधनाने त्यांच्या परिवारावर दुःखाचा प्रचंड डोंगर कोसळला आहे. गोंदिरा, आंबेबनमळा, यपावाडी, खानजोडवाडी येथे भावकी आणि तडवळे ही सासरवाडी असलेल्या गोरखनाना पाटील यांचा सर्व क्षेत्रात मोठा मित्र परिवार आहे.
आयुष्यभर अतिशय निष्टेने, कष्टाने पाटबंधारे विभागात सेवा बजावलेल्या गोरखनानांना हजारो शेतकऱ्यांत सच्चे मित्र म्हणून ओळखले जात असे. शांत, संयमी, मृदुभाषी तथा मिश्कील स्वभावाच्या गोरखनाना पाटील यांना अजातशत्रु , नेक व्यक्तीमत्व म्हणून सर्वदूर परिचित होते.