कोल्हापूर : हजारो भाविकांनी कोल्हापूर ते जोतिबा डोंगर असा पायी प्रवासाने रविवारी जोतिबाचे दर्शन घेतले जाते. कोल्हापूरच्या अंबाबाईने पायी अनवाणी चालत येवून श्री जोतिबा दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते . हीच परंपरा चालू ठेवत कोल्हापुरचे भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत रविवारचे खेटे घालतात . कोल्हापूर शहरा बरोबरच आता महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील भाविक ही मोठया श्रद्धेने खेटे यात्रेत सहभागी होत आहेत.
आज रविवारी पहिला खेटा मोठया भक्तीमय वातावरणात सुरुवात झाला .पहाटे तीन पासुनच कोल्हापूर , वडणगे , निगवे , कुशिरे गाय मुख मार्गे जोतिबा मंदिरात भाविक चालत आले.जोतिबा डोंगरच्या पाय वाटा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. चांगभलं चा गजर डोंगर घाटातून घुम लागला. आज पहिल्याच खेट्याच्या रविवारी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी जोतिबा डोंगरावर गर्दी करायला सुरुवात केली होती. मंदिराजवळ असणाऱ्या नवीन दर्शन मंडप इमारतीमध्ये दर्शन रांगेची व्यवस्था केली आहे.

रविवारी पहाटे ४ वाजता मंदिराचे दरवाजे उघडले सकाळी ८ ते९ अभिषेक, सकाळी ११ वाजता धुपारती निघाली .,दुपारी ३ ते४ अभिषेक होणार आहे, रात्री पालखी निमणार आहे . पुजारी व प्रशासनामार्फत येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधा साठी जय्यत तयारी केली आहे ..जोतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती कोल्हापूरच्या अंबाबाईने पायी अनवाणी चालत येवून जोतिबा दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका जोतीबाच्या पूजाऱ्यांकडून सांगण्यात आली.