Latest Marathi News

BREAKING NEWS

स्पर्धा परीक्षेत गैरप्रकार केल्यास दोषींना जन्मठेप व भरावा लागणार १० कोटींचा दंड

0 29

डेहराडून : राज्यातील स्पर्धा परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी उत्तराखंड सरकारने इतिहासातील आतापर्यंतचा सर्वांत कठोर कायदा बनवला आहे. कायद्यातील तरतुदी ऐकल्यानंतर परीक्षेत कॉपी किवा इतर गैरप्रकार करणे सोडा तसे करण्याचा कोणी स्वप्नातही विचार करणार नाही. कारण, दोषींना जन्मठेप व तब्बल १० कोटी रुपयांचा दंडही होऊ शकतो.

शासनाने स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार थांबविण्यासाठी जारी केलेल्या उत्तराखंड स्पर्धा परीक्षा अध्यादेशाला (भरतीत अनुचित साधनांना प्रतिबंध आणि निवारणाचे उपाय) राज्यपाल गुरमीत सिंग यांनी मंजुरी दिली आहे. यानंतर हा अध्यादेश कायदा बनला आहे.

Manganga

उत्तराखंडमधील स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका छापण्यापासून निकाल प्रकाशित करण्यापर्यंतच्या प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्यांना आता जन्मठेपेसह १० कोटी रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. अशा कृत्यांद्वारे मिळवलेली त्यांची मालमत्ताही जप्त करण्याची तरतूद या कायद्यात आहे. अध्यादेशाला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यपालांचे आभार मानले. प्रत्येक स्पर्धा परीक्षेत कॉपी विरोधी कायदा लागू केला जाईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!