Latest Marathi News

BREAKING NEWS

राशीभविष्य : आज दिनांक १२ फेबुवारी २०२३ : कसा असेल तुमचा आजचा, दिवस जाणून घ्या सविस्तर…

0 626

मेष
आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी आहे. कुटुंबातील आनंददायी वातावरण पण आपल्या मनाला प्रफुल्लित राहण्यात मदत करेल. घरात सुखद प्रसंग घडतील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. सामाजिक क्षेत्रात आपणाला यशकीर्ती लाभ होईल. व्यापारात भागीदारांशी चांगले संबंध राहतील. वैवाहिक जोडीदाराशी जवळीक वाढेल.
वृषभ
आज वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनाला काळजी लागून राहील. पोटाच्या तक्रारीमुळे मन अस्वस्थ राहील. दुपार नंतर ह्या तक्रारीपासून मुक्तता मिळेल. मानसिक दृष्टया सुद्धा तणाव दूर झाल्याचा अनुभव येईल. स्त्रियांना माहेरहून एखादी चांगली बातमी मिळेल.
मिथुन
आज उत्साहाचा अभाव राहील. कुटुंबातील व्यक्तींशी वाद होण्याची शक्यता आहे. स्थावर संपत्तीशी संबंधित व्यक्तींपासून सावध राहावे लागेल. अचानक धन खर्च होईल. वाद होण्याच्या शक्यतेमुळे बौद्धिक चर्चेत सहभागी न होणे हितावह राहील.
कर्क
आज हातून एखादे कार्य अविचाराने होईल, तेव्हा काळजी घ्यावी. आप्तस्वकीयांच्या भेटीने आनंद होईल. त्यांच्याशी प्रेमपूर्ण संबंधामुळे आपला आनंद वृद्धिंगत होईल. मनोबल चांगले असल्याने प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. दुपार नंतर मात्र थोडी प्रतिकूलता जाणवेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागेल. खर्चात वाढ संभवते.
सिंह
आज बौद्धिक क्षमतेत वाढ झाल्याने चर्चेत सहभागी होऊ शकता पण वाद टाळावे लागतील. घरातील सदस्यां बरोबर वेळ चांगला जाईल. आर्थिक लाभ संभवतात. दुपार नंतर मात्र सावध राहावे लागेल. भावंडां कडून लाभ होईल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल.
कन्या
आपल्या वाणीच्या प्रभावाने आज आपणाला मोठे लाभ होतील. इतर लोकांशी असणार्‍या संबंधात प्रेमवृद्धी होईल. प्रवास आनंददायी होईल. व्यावसायिक क्षेत्रातही लाभ होईल. घरगुती वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ होईल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल.
तूळ
आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. बोलण्यावर संयम ठेवल्यामुळे वातावरण शांत करण्यात सफल व्हाल. कायद्याशी संबंधित बाबी व निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. गैरसमज दूर करावे लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. दुपार नंतर मात्र प्रसन्नता लाभेल. आर्थिक लाभ संभवतात.
वृश्चिक
विवाहेच्छुकांचा विवाह ठरण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. प्राप्ती व व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. मित्रांसह सहलीस जाऊ शकाल. त्यांच्या सहवासात आपला वेळ आनंदात जाईल. दुपार नंतर मात्र स्वभावात संताप आणि उग्रपणा वाढण्याची शक्यता आहे. मित्रांशी मतभेद झाल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.
धनु
आज आपली कामाची योजना यशस्वीपणे पूर्ण होईल. व्यावसायिक यश प्राप्ती होईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. कुटुंबात आनंद उल्हासाचे वातावरण राहील. मित्रांच्या भेटीने मन प्रफुल्लित राहील. प्रवास संभवतात. धनलाभाच्या दृष्टिने आजचा दिवस शुभ आहे. संतती विषयक एखादी चांगली बातमी मिळेल.
मकर
परदेशगमनाची अपेक्षा करणार्‍यांना यशप्राप्ती संभवते. एखादा प्रवास संभवतो. कुटुंबीयांमध्ये आनंद उत्हासाचे वातावरण राहील. नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. धनलाभ व सामाजिक मान- सन्मान होतील. पित्याकडून लाभ होतील. वैवाहिक जीवनात मतभेद संभवतात.
कुंभ
आजचा दिवस काहीसा प्रतिकूल असल्याने नव्या कामाची सुरुवात आज न करणे हितावह राहील. आरोग्य संवर्धनाच्या हेतूने आहाराकडे लक्ष द्यावे लागेल. वाणीवर संयम ठेवलात तरच कोणाशी वाद किंवा मतभेद टाळू शकाल. दुपार नंतर प्रसन्नता वाढेल. आरोग्यात सुद्धा सुधारणा होईल. एखाद्या धार्मिक कार्याचे किंवा प्रवासाचे नियोजन करू शकाल. भावंडांकडून लाभ संभवतात. आर्थिक लाभ होतील.
मीन
आज व्यापारी भागीदारीत आपणाला लाभ होईल. एखाद्या मनोरंजनात्मक ठिकाणी स्नेह्यांसह आनंदात वेळ घालवल्याने मन प्रफुल्लित होईल. दुपार नंतर मात्र परिस्थितीत बदल झाल्याचा अनुभव येईल. दुपार नंतर नवीन कार्यात अडचणी निर्माण होतील. शक्यतो प्रवास टाळा. क्रोधावर नियंत्रण ठेवा. कुटुंबियांशी भांडण होण्याची शक्यता आहे.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!