माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी दि. ११ : आटपाडी तालुक्यातील तडवळे येथील शेतकरी भागवत दत्तू डुबुले (वय ४८) यांचे गुरुवारी रात्री शेताला पाणी देण्यासाठी गेल्यानंतर सर्पदंश होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घडली.
तडवळेचे तरुण शेतकरी भागवत दत्तू डुबुले हे गुरुवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास आपल्या घरातून शेतातील पिकला पाणी देण्यासाठी गेले होते. सकाळी त्यांच्या पत्नी मालाबाई या पती भागवत यांना चहा घेऊन गेले असता त्यांना पती भागवत हे रानातच पडलेले दिसले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर नागरिक जमा झाले. यावेळी त्यांना आटपाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान एका तरुण शेतकऱ्याचा सर्पदंश होऊन मृत्यू झाल्याने संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त होत आहे. तडवळे येथील प्रसिद्ध कीर्तनकार अनिल महाराज यांचे भागवत डुबुले हे वडील होते.
