Latest Marathi News

BREAKING NEWS

नोकरीला लावतो असे सांगून तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक

0 106

रत्नागिरी : नोकरी डॉट कॉम कंपनीचा अधिकारी बोलत असल्याचे भासवून देऊड – चिंचवाडी (ता. रत्नागिरी) येथील तरुणाला नोकरीचे आमिष दाखवत तब्बल १२ लाख ४० हजार ७३९ रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी रत्नागिरी सायबर पोलिस स्थानकात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ९ डिसेंबर २०२२ ते ३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत घडला.

 

याप्रकरणी राहुल देवजी खापले (२२) याने फिर्याद दिली आहे. त्याच्या मोबाइलवर रोशनसिंग नावाच्या व्यक्तीचा फोन आला. आपण नोकरी डॉट कॉम कंपनीचा अधिकारी बोलत असल्याचे सांगून महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीमध्ये नोकरी लावतो असे सांगितले. त्यानंतर कंपनीच्या हितेश नावाच्या व्यक्तीच्या युनियन बॅंकेच्या खात्यात टप्प्या-टप्प्याने २ लाख ३८ हजार ८८८ रुपये भरायला सांगितले.

Manganga

 

कनक, कार्तिक, अभिषेक समंथा, राजेश्वर या व्यक्तींनी कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक केली. या सर्वांनी संगनमताने महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीमध्ये डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी या पदासाठी उत्पादन विभागात निवड झाल्याचे सांगितले. त्यानंतर विविध कंपनीतील विविध प्रक्रियेची कारण देत अमित शुक्ला नावाच्या व्यक्तीच्या कॅनरा बॅंकेतील खात्यात टप्प्या-टप्प्याने १० लाख ०१ हजार ८५१ रुपये भरण्यास सांगितले.

 

मात्र, नोकरी लागल्याचा बनाव झाल्याचे लक्षात येताच आपली १२ लाख ४० हजार ७३९ रुपयांना फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने सायबर पोलिस स्थानकात फिर्याद दिली असून, रोशन सिंग, कनक कार्तिक, अभिषेक समंथा, राजेश्वर (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!