Latest Marathi News

BREAKING NEWS

५५ हजार कोटी बुडाले! अदानींना पुन्हा झटका…

0 288

अमेरिका : उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या समूहासाठी या आठवड्याचे पहिले तीन दिवस दिलासादायक ठरलेले असताना आज पुन्हा एकदा धक्का बसला आहे. इंडेक्स प्रोव्हायडर एमएससीआयने अदानी ग्रुपच्या चार कंपन्यांच्या वेटिंगमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर कंपन्यांच्या शेअर्समध्ये पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती आता ५५ हजार कोटी रुपयांनी म्हणजे १० टक्क्यांहून अधिक घसरली आहे.

एमएससीआयच्या माहितीनुसार अदानी ग्रुपच्या चार कंपन्यांच्या वेटिंगमध्ये घसरण आली आहे, ज्यात प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा समावेश आहे. अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या २४ जानेवारीच्या अहवालानंतर अदानी समूहावर स्टॉक मॅनिप्युलेशनचा आरोप करण्यात आला आहे. अदानी समूहाने कोणताही गैरकारभार झाला नसल्याचा दावा केला आहे.

Manganga

या घसरणीमुळे गौतम अदानी यांच्या नेटवर्थलाही मोठा फटका बसला आहे. फोर्ब्स रिअल टाईम अब्जाधीशांच्या मते, गौतम अदानी यांच्या संपत्तीत १० टक्क्यांहून अधिक म्हणजे ६.६ अब्ज डॉलर्सची (सुमारे ५५,००० कोटी रुपये) घट झाली आहे. फोर्ब्सच्या मते, सध्या गौतम अदानी यांची संपत्ती ५८.४ अब्ज डॉलर आहे. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती एका दिवसापूर्वी ६० बिलियन डॉलरपेक्षा जास्त झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!