जर चांगले असतील तर शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ होते. त्यामुळे पेरणी करताना चांगले प्रमाणित बियाणांचा वापर करणं गरजेचं असते. परंतु सध्या बाजारात सुधारित वाणांचे बियाणे खूप महाग आहे. ते बियाणे खरेदी करणे प्रत्येक शेतकऱ्याच्या आवाक्यात नाही. त्यामुळे विविध राज्य सरकारकडून या बियाणांवर अनुदान उपलब्ध करुन दिले जाते. अशातच राजस्थान सरकारकडून मात्र, शेतकऱ्यांना मोफत बियाणे दिले जात आहेत. याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.
राजस्थान सरकारने किसान साथी योजना आणि मुख्यमंत्री बीज स्वावलंबन योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी आणि शेतकरी गटांना मोफत बियाणे वितरित केले जातात. जेणेकरुन त्यांना कमी खर्चात चांगले उत्पादन मिळू शकेल. मुख्यमंत्री बीज स्वावलंबन योजनेंतर्गत, कृषी विभागाने 30 ते 50 शेतकऱ्यांचे गट तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जेणेकरुन ते परस्पर सहकार्याने शेती करु शकतील. आता कृषी विभाग या शेतकऱ्यांच्या गटांची ओळख करून देतो आणि RSSC मार्फत मोफत बियाणांचे वाटप केले जाते. यानंतर शेतकऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाते, त्यानंतर शेतकरी बियाणे तयार करुन विक्री करु शकतात.

मुख्यमंत्री बीज स्वावलंबन योजनेंतर्गत, दारिद्र्यरेषेखालील SC, ST, अल्प आणि अत्यल्प, गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील शेतकर्यांतना प्राधान्याने बियाणांचे मिनी किट वितरित केले जाते. शेतकरी कुटुंबातील महिला सदस्याला राज्य सरकारकडून बियाणांचे स्वतंत्र मिनी किट देण्याची तरतूद आहे. सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना बियाणांचे मिनी किटही प्राधान्याने वाटप केले जाते.