माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगोला : सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीला अपघात झाला आहे. सांगोला तालुक्यातील नाझरा गावाजवळ काल दुपारी अपघात झाला आहे. अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. सांगोला तालुक्यातील नाझरा येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित शिबिरासाठी गेले होते. शिबिराचा कार्यक्रम संपल्यानंतर ते सांगोला शहराकडे येत असताना त्यांच्या वाहनाच्या पुढे पोलीस गाडीचा ताफा होता. त्यातील एका गाडीचा आणि मोटार सायकलीचा अपघात झाला. अपघातात आटपाडी तालुक्यातील माडगुळे येथील अशोक नाना वाघामारे (वय ५०) (हल्ली मुक्काम एखतपूर ता. सांगोला) हे जागीच ठार झाले. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सांगोला पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली करण्यात आली आहे.
शहाजी पाटील यांच्या ताफ्यातील पोलिसांची गाडीला (एमएच १४, डीएम ९४४०) अपघात झाला. या अपघातात एक दुचाकीस्वार ठार झाला. आमदार पाटील यांच्या ताफ्यातील कोणालाही जखम झाली नाही. ही घटना दुपारी साडेचारच्या सुमारास माळवाडी-नाझरा येथे घडली. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला असून. सांगोला पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.
