माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहराच्या साठेनगरच्या पूर्वेस रस्त्यालगत भर दुपारी बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरी झाल्याने साठेनगर परिसरात खळबळ माजली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी साठेनगरच्या पूर्वेस पुजारवाडी रस्त्यालगत महात्मा आप्पासो जाधव यांचा बंगला आहे. ते महात्म्गा गांधी विद्यालय कौठुळी येथे कार्यरत आहेत. काल दुपारच्या सुमारास त्यांच्या घरातील सर्व जण हे पिंपरी खुर्द जाधवमळा या ठिकाणी त्यांच्या असणाऱ्या शेतामध्ये गेले होते.

दुपारच्या सुमारास ते आपल्या आटपाडी येथील घरी आले असता त्यांना घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडले असल्याचे दिसले. तर आत मध्ये गेल्यावर घरातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या. यावेळी आप्पासो जाधव यांच्या पत्नी व आई यांनी आप्पासो जाधव यांना संपर्क करून घरामध्ये चोरी झाली असल्याचे सांगतिले. यावेळी आप्पासो जाधव यांनी पोलिसांना संपर्क करून चोरीच्या घटनेची कल्पना दिली.
आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. यामध्ये दोन तोळे सोने व रोख १० हजार रुपये असे अंदाजे एक लाख रुपयापेक्षा जादा रक्कमेची चोरी झाली असल्याचे निष्पन झाले आहे. चोरट्यांनी आप्पासो जाधव यांच्या पत्नीची पर्सची देखील चोरी केली. सदरची पर्स ही सोमेश्वरनगर परीसरामध्ये चोरट्यांनी टाकून दिली. यामध्ये आधार कार्ड, मतदान कार्डावरून कागदपत्रे असणारी पर्स आप्पासो जाधव यांना आणून दिली. त्यामुळे दिवसाढवळ्या झालेली चोरीने परिसरातील नागरिक भयभयीत झाले आहेत.