माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : वस्तु व सेवा कर भवन, राज्य कर उपायुक्तं कार्यालय, सांगली येथे कार्यरत असणाऱ्या एका महिला अधिकारास लाच घेताना रंगेहात पडकले असून सदरची कारवाई ही सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदर महिला ही काम करोत असलेल्या हॉंस्पीटलमधील कर्मचारी यांचे व्यवसाय कर ब घरफॉरमन्सनस यावरील लेट फि व पेनल्टी माफ करणेबाबत तसेच वाढीव रक्कमेची नोटीस न देणेकरीता श्रीमती स्वप्नाली सतिश सावंत, बय ३९ वर्ष, व्यवसाय कर अधिकारी, राज्य कर उपायुक्ता कार्यालय, सांगली. यांनी तक्रारदर यांचेकडे २५०००/- रूपये लाच मागणी केली असल्याची तक्रार सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली होती. केली होती.

याबाबतची खात्री केल्यानंतर श्रीमती स्वप्नाली सावंत, कर अधिकारी यांचे विरुद्ध राज्य कर उपायुक्त कार्यालय, सांगली या ठिकाणी सापळा लावला असता तक्रारदार महिलेकडे सावंत यांनी लाचेची मागणी करून १५०००/- रूपये लाच रक्कम स्विकारली असताना त्याना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी श्रीमती स्वप्नाली सावंत यांच्या विरुद्ध संजयनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई अमोल तांबे, पोलोस उप आयुक्त, पोलीस अधक्षक, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मा्गदशनाखाली पोलीस उप अधीक्षक संदीप पाटील, विनायक मिलारे पोलीस निरीक्षक, दत्तात्रय पुजारी पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने केली.