माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 21 ते 22 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पातळीवरील हॉलीबॉल स्पर्धांचे मैदान रंगणार आहे. यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, राजस्थान, महाराष्ट्र यासह अन्य राज्यांमधील 42 नामवंत संघ सहभागी होणार आहेत.
सदरची स्पर्धा ही आटपाडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत भवन मैदानावर संपन्न होणार असून या ठिकाणी भव्य स्टेडियम आणि मैदान बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आमदार अनिलभाऊ बाबर, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या ऑल इंडिया शूटिंग शूटिंग हॉलीबॉल स्पर्धा रंगणार आहेत.

तर गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 पासून आटपाडीतील श्रीराम कॉलेजच्या मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य गाव वाईज फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. यातील विजेत्यांना 51000 चे पहिले बक्षीस दिले जाणार आहे. ‘संचालक चषक’ या नावाने होणाऱ्या सदरच्या भव्य क्रिकेट स्पर्धा सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, अध्यक्ष श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव शिवाजीराव पाटील, युवा नेते दत्तात्रय पाटील (पंच) यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत.