Latest Marathi News

BREAKING NEWS

धक्कादायक: वीजबिल न भरल्याच्या बोगस मेसेजने कंपनीच्या अधिकाऱ्याला झटका

0 191

मुंबई : वीजबिल न भरल्याच्या बोगस मेसेजचा झटका नुकताच एअर इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्याला बसला. त्यांना ५८ हजार ९४२ रुपये गमवावे लागले. त्यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदार गुर्ले रमणा (वय ४५) एअर इंडियात टेक्निकल ऑफिसर आहेत. त्यांना ५ फेब्रुवारीला व्हॉट्सॲप मेसेज आला. त्यात ‘आपले गेल्या महिन्यातील बिल अद्ययावत झाले नसून, त्यामुळे आज रात्री आपल्या घराची वीज तोडणी केली जाईल’, असे नमूद केले होते. रमणा यांनी संबंधित क्रमांकावर फोन केला. संबंधिताने त्यांना सांगितले की, तो अदानी वीज कंपनीतून बोलत असून, वीज बिल न भरल्याने त्यांच्या घराचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यावर बिल भरल्याचे रमणा यांनी सांगितले.

Manganga

तेव्हा ते अपडेट झालेले नसल्याचे सांगत त्यांना अदानी वीज कंपनीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जाण्यास सांगितले. त्यानुसार रमणा यांनी फॉलो करत क्रेडिट कार्डने १० रुपये भरले. मात्र, ते अद्याप आम्हाला मिळालेले नसून, भामट्याने रमणा यांना त्यांच्या मोबाइलवर ॲनी डेस्क ॲप व अन्य ॲप डाऊनलोड करायला लावत पैसे न मिळाल्याचे सांगितले.

रमणा यांना फोन पे वर जात ॲड न्यू अकाऊंट करायला लावले. एचडीएफसी बँकेचा आयएफएससी कोड देत त्यांच्या नावाने पेटीएमच्या प्रोसिड टू पे वर क्लिक करून ४७५७९ आणि रमणा यांच्या मोबाइल क्रमांकाचे शेवटचे चार अंक टाकायला लावले. रमणा यांना १ हजार ४९४ रुपये हस्तांतरण झाल्याचा मेसेज आला आणि वीज बिल आता अद्ययावत झाल्याचे सांगत संबंधिताने फोन ठेवला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!