Latest Marathi News

BREAKING NEWS

युवा शिवसेना प्रमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याची शिंदे सरकाकडून गंभीर दखल

0 73

मुंबई : आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान आता अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाणार आहे. या यात्रेत आता जास्त पोलिस बंदोबस्त असणार आहे. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान महालगावात यात्रा आणि रमाईंची मिरवणूक एकाच वेळी सुरु झाल्याने हा वाद झाला होता.

मिरवणूकीवेळी डीजे बंद करायला सांगितल्याने वाद सुरू झाला. यानंतर आंबादास दानवे आणि आदित्य ठाकरे यांची गाडी आडवण्याचा प्रयत्न देखील झाला होता.तसेच काही प्रमाणात गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक ही झाली. त्यानंतर आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Manganga

तसेच या कार्यक्रमादरम्यान चंद्रकांत खैरे यांचं भाषण सुरु असताना अज्ञाताने स्टेजवर दगड भिरकावल्याचा प्रकार देखील घडला. यानंतर काही काळासाठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!