संचालकपदाची मुदत संपल्यावर राजीनामे हा नौटंकीपणा : सतीश भिंगे यांची टीका : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून फक्त गोंधळ
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : वीरशैव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या त्या सहा संचालक यांनी मुदत संपल्यावर राजीनामे दिले असल्याने सदरचे प्रकरण नौटंकीपणा असल्याचे सांगत राजीनामा दिलेल्या संचालक यांच्यावर चेअरमन सतीश भिंगे यांनी टीका केली.

वीरशैव पतसंस्थेने आटपाडी तालुक्यात अग्रगण्य पतसंस्था म्हणून लौकिक मिळविला आहे. हे यश राजीनामा दिलेल्या संचालकांच्या डोळ्यात खुपत असून त्यांनी पतसंस्थेला बदनामी करण्याचा ठेकाच घेतला आहे. तसेच इतर खर्च व अपहाराबाबत बोलताना ते म्हणाले, संस्थेने गत ६ वर्षे सर्व ठराव व खर्चाला सर्व संचालकांची संमती आहे.वार्षिक सभेत तरतुद केल्याशिवाय कोणताही खर्च केला जात नाही. आज खोटे आरोप करणार्या संचालकांनीच सर्व विषयांना मंजुरी दिल्याचे सतीश भिंगे म्हणाले.
तसेच संस्थेच्या नियमानुसारच कामगार भरती केली आहे. आटपाडी येथे संस्थेचे स्वतंत्र हेडईऑफीस केले आहे. आटपाडी व दिघंची येथे दोन शाखा कार्यरत आहेत. संस्थेने २१ लाख रूपये खर्चुन जागा खरेदी करून स्वमालकीची तीन मजली इमारत बांधकामाचे भूमिपूजन केले आहे. लवकरच इमारत निधीतुन ४० लाखं खर्चुन बांधकाम पुर्णत्वास येईल. हे गत १० वर्षात मोठी प्रगती केली आहे. हीं प्रगती डोळ्यात खुपणार््या व कर्जबुडव्या विघ्नसंतोषी लोकांनी पतसंस्था. बदनामीचा ठेका घेतला आहे.
तसेच आरोप करणाऱ्या संचालकांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे.त्यामुळे त्यांचे राजीनांमे निरर्थक असून केवळ दिखावा आहे. तसेच राजीनामा दिलेले संचालक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी संस्थेचे घेतलेले कर्ज थकीत ठेवले असून त्यांची हि भूमिका संस्थेला अडचणीत आणणारी असून थकीत असल्याने त्यांचे नाव संस्थेच्या प्रारूप मतदार यादीत नाव नसल्याने त्यांचा कांगावा सुरु आहे. त्यामुळे अगोदर थकीत कर्ज भरा, मगच राजीनामा देण्याचे नाटक करा असे आव्हान देखील त्यांनी दिले.
संस्थेची लवकरच झरे, निंबवडे, करगणी येथे शाखा सुरू होणार असून संस्थेकडे मार्च २०२२ अखेर १० कोटी ५८ लाख ४९ हजारांच्या ठेवी आहेत. ९ कोटी ११ लाख ४५ हजार कर्जवाटप आहे. अधिक भागभांडवल २ कोटी, वसुल भागभांडवल १ कोटी ३६ लाख, राखीव व इतर निधी १ कोटी ४८ लाख, निव्वळ नफा ३० लाख ९९ हजार, स्वनिधी १ कोटी ८७ लाख, खेळते भागभांडवल १४ कोटी २८ लाख, एनपीए ० टक्के, गुंतवणूक ४ कोटी ६ लाख, सीडी रेशो ६८.४० टक्के असून संस्था सातत्याने सभासदांना १० टक्के लाभांश देत