मुंबई : दहशतवादी हल्ल्याच्या धमकीचा एक फोन सोमवारी मुंबई पोलिसांना आला होता. हा फोन कोणी केला होता हे आता समोर आले आहे. एका दहशतवादी संघटनेच्या सदस्यानं फोन केल्याचं उघड झाले. असून याप्रकरणी आता गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी आलेल्या धमकीच्या फोननंतर मुंबई पोलीस आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा एजन्सीजना अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. हा फोन करणाऱ्या व्यक्तीनं आपली ओळख उघड केली आहे. इरफान अहमद असं या व्यक्तीचं नाव असून तो इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे.
याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून याची सखोल चौकशी सुरु करण्यात आल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले.