जगप्रसिद्ध असणारे भारतीय व्यावसायिक यांना त्यांच्याविरुद्धची याचिका हायकोर्टाने फेटाळली; पासपोर्ट जप्त करण्यासाठी न्यायालयाने केली विनंती
नागपूर : जगप्रसिद्ध भारतीय व्यावसायिक गौतम अदानी यांच्याविरुद्धची एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी पहिल्याच सुनावणीनंतर फेटाळून लावली. संबंधित याचिका दखल घेण्यासारखी नाही, असे न्यायालयाने हा निर्णय देताना सांगितले. अदानी समूहावर ओढवलेले आर्थिक संकट लक्षात घेता गौतम अदानी यांचा पासपोर्ट जप्त करण्यात यावा, अशी विनंती या याचिकेद्वारे न्यायालयाला करण्यात आली होती.

नवीन मानकापूर (नागपूर) येथील पत्रकार सुदर्शन बागडे यांनी ही याचिका दाखल केली होती. अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने गैरव्यवहाराचा आरोप केल्यामुळे अदानी समूहाचे शेअर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. अवघ्या चार-पाच दिवसांत गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
तसेच, अदानी यांच्या संपत्तीमध्येही मोठी घट झाली आहे. त्यामुळे ते जगातील २० सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून बाहेर पडले आहेत. या परिस्थितीत ते विदेशात पळून गेल्यास भारतातील वित्तीय संस्था, गुंतवणूकदार आदींचे नुकसान भरून निघणार नाही.