भाजपाच्या पदाधिकाऱ्याकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण! ठाकरे गटाच्या आमदारांना ताब्यात घेण्याची शक्यता
सिंधुदुर्ग : राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा भाजपा आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी दोन्ही गटांकडून एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की आणि मारहाण झाली.
कणकवलीमधील कनेडी गावातील बाजारपेठेत भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याने या वादाला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

यावेळी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हातात दांडा घेऊन जमावासमोर गेलेल्या वैभव नाईक यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून आता कोणत्याही क्षणी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जाऊ शकते.
भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी, आता अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिंधुदुर्गातील प्रसिद्ध आणि कोकणवासीयांचं श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीच्या यात्रेमुळे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कारवाई टाळली होती. मात्र, आता पोलीस यंत्रणा एक्शन मोडवर असून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना पोलीस कुठल्याही क्षण ताब्यात घेऊ शकतात, अशी चर्चा जिल्ह्यात आहे.