पिंपरी : चिंचवड विधानसभा पोट निवडणूकीत उमेदवारीचा तीन दिवस सुरू असणारा तिढा सुटला असून नाना काटे यांना मंगळवारी सकाळी उमेदवारी जाहिर केली आहे. मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.चिंचवड विधानसभेची पोट निवडणूक जाहिर झाली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास चोविस तास उरले आहेत. मात्र, महाविकास आघाडीकडून सोमवारी दिवसभर उमेदवारी जाहिर केली नाही. महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या अधिक असल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विरोधीपक्षनेते अजित पवार, निरिक्षक आणि आमदार सुनील शेळके, शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी इच्छुकांची मनधरणी केली.

राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, नवनाथ जगताप, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, माया बारणे, राजेंद्र जगताप हे इच्छुक होते. त्यांची मनधरणी करण्याचे काम तीन दिवसांपासून सुरू होते. नेते आणि इच्छुकांमधील चर्चांची खलबते दिवसभर सुरू होती.