“मदार” या मराठी चित्रपटाचे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कौतुक : प्रमुख भूमिकेत मिलिंद शिंदे : आटपाडीच्या रविकिरण जावीर यांचीही भूमिका
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : “मदार” या मराठी चित्रपटाची निवड २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३ (महाराष्ट्र शासन) स्पर्धेसाठी झाली आहे.
या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शक मंगेश बदर यांनी केले आहे. यामध्ये मिलिंद शिंदे यांची प्रमुख भूमिका असून आटपाडी येथील रविकिरण जावीर यांची सुद्धा यामध्ये डॉक्टरची चरित्र अभिनेता म्हणून भूमिका आहे. दिनांक २ फेब्रवारी ते ९ फेब्रवारी दरम्यान पुणे येथे हा चित्रपट महोत्सव सुरु आहे.
तर दिनांक ६ फेब्रुवारी चा शो पूर्ण हाउसफुल्ल होता. ‘मदार’ फिल्म मधील टीमलासुद्धा बसण्यासाठी जागा मिळाली नाही. मदार टीम मधील बरेच जण बाहेर होते. परंतु चित्रपट हाऊस फुल्ल झाल्याचा वेगळा आनंद होता. फिल्म पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी अतिशय चांगल्या प्रतिक्रिया दिल्या व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कौतुकाने आणि शुभेच्छाने ‘मदार’ वरील मदार वाढत जात आहे.
