Latest Marathi News

BREAKING NEWS

‘या’ जिल्ह्यातील ९० डॉक्टरांना चार महिने पगारच नाही

0 137

रत्नागिरी: ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सेवा देणाऱ्या तदर्थ वैद्यकीय अधिकारी ऑक्टाेबर २०२२ पासून मानधनाविना काम करत आहेत. वेतनासाठीचे अनुदान न आल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन अद्याप झालेले नाही. अनेक महिने सेवा बजावूनही अद्याप मानधन न मिळाल्याने जिल्ह्यातील ९० तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आता वेतन वेतन करण्याची वेळ आली आहे.

 

रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी पदावर एमबीबीएस पदवीधर उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या जागी बीएएमएस पदवीधर नियुक्त करण्यात आले आहेत. शासन निर्णयानुसार सप्टेंबर २०१९पासून जिल्ह्यामध्ये ९० तदर्थ वैद्यकीय अधिकारी काम करीत आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा भार हा मोठ्या प्रमाणावर तदर्थ वैद्यकीय अधिकारी यांच्यावर आहे. तदर्थ वैद्यकीय अधिकारी हे नियमित वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणेच सर्व जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.

Manganga

 

कोविडच्या महामारीमध्ये सर्व तदर्थ वैद्यकीय अधिकारी यांनी आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा केली आहे. त्यामुळे त्यांचा ‘कोविड योध्दा’ म्हणून सन्मानही करण्यात आला होता. एवढी मोठी जबाबदारी पार पडत असतानाही त्यांना केवळ ४० हजार मानधनावर काम करावे लागत आहे. तुटपुंजा मानधनावर काम करताना त्यांना आर्थिक व पर्यायाने कौटुंबीक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेळेवर मानधन दिले जात नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!