दिल्ली: आम्ही कोणी साधु सन्यासी नाही. असं वक्तव्य भाजप नेते नितीन गडकरी यांनी केलं आहे. त्यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे
आजतकच्या बजेट कॉन्क्लेव्हमध्ये गडकरी बोलत होते. इलेक्ट्रिक वाहन, एक्स्प्रेस-वेपासून ते बजेटपर्यंत चर्चा केली. सोबतच गडकरींनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीवरही महत्वाची प्रतिक्रिया दिली.
आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मोफत अन्नधान्य, करमाफी आणि इतर दिलासे दिले जात आहेत? असा सवाल उपस्थित केला.

‘प्रत्येक नेता निवडणुका डोळ्यासमोर ठेवत असतो, आम्हीही तेच करतोय. आम्ही राजकारणी आहोत, संन्यासी नाही. आम्ही इथे पूजा-पाठ करायला आलो नाहीत. आम्ही निवडणूक जिंकण्यासाठीच आलो आहोत. चांगले काम केले तर पुढे जिंकू. जो चांगले काम करेल, जनता त्यालाच पुढच्या वेळे निवडून देईल. म्हणूनच आम्ही काम करतो आणि निवडून येतो,’ असे गडकरी म्हणाले.
आम्ही ग्रीन एक्सप्रेस हायवे बनवत आहोत. दिल्ली-मुंबई रस्ता तयार होत आहे. 12 तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दिल्ली ते मुंबई 12 तासांत पोहोचेल. दिल्ली ते जयपूर हे अंतर 2 तासांचे होईल.