Latest Marathi News

BREAKING NEWS

छत्रपती शिवाजी टर्मिनल उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते

0 199

मुंबई: येत्या १० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी मुंबई पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे.
जारी करण्यात आलेल्या अलर्टमध्ये मुंबई पोलिसांनी मरोळ, अंधेरी, कुलाबा, सीएसटी येथे पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या ठिकाणी ड्रोन आणि इतर गोष्टींवर बंदी घातली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर येणार असून, यादरम्यान ते छत्रपती शिवाजी टर्मिनल येथे पंतप्रधान वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करणार आहेत.

दरम्यान, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कलम 144 अंतर्गत अलर्ट जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी मुंबई पोलीस केंद्रीय यंत्रणांसोबत काम करत आहेत.

Manganga

लवकरच दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू होणार असून, एक वंदे भारत ट्रेन मुंबई-सोलापूर मार्गावर तर, दुसरी मुंबई शिर्डी मार्रगावर धावणार आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून दोन्ही वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. या दोन्ही गाड्या चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!