Latest Marathi News

BREAKING NEWS

धक्कादायक! चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने हॉस्पिटलची ऑक्सिजन पुरवठा करणारी लाईन कापली २० मुलांचे प्राण संकटात

0 134

जयपूर : राजस्थानमधील अलवर येथून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. येथे चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने केलेल्या एका कृतीमुळे २० मुलांचे प्राण संकटात सापडले होते. या चोरट्यांनी रविवारी रात्री रुग्णालयात घुसले. तिथे त्यांनी ऑक्सिजन सप्लाय करणारी पाइप लाइन चोरण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी चोरांनी ऑक्सिजन पाइप लाइन कापली.

त्यामुळे एफबीएनसी वॉर्डमध्ये सुमारे २० नवजात मुले ऑक्सिजन सपोर्टवर होते. या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. घाईगडबडीत रुग्णालयातील स्टाफने तिथे असलेले लोक आणि पोलिसांच्या मदतीने सिलेंडरच्या मदतीने मुलांचे प्राण वाचवले. सुदैवाने यादरम्यान रुग्णालयात मोठी दुर्घटना घडली नाही.

Manganga

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील गीतानंद शिशू रुग्णालयामध्ये रविवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. हॉस्पिटलमध्ये असलेली ऑक्सिजन सप्लायची पाईप लाइन चोरण्याच्या प्रयत्नामध्ये चोरट्यांनी ती कापली. त्यावेळी रुग्णालयातील एफबीएनची वॉर्डमध्ये भरती २० मुले ऑक्सिजन सपोर्टवर होती. अचानक ऑक्सिजनची सप्लाय बंद झाल्याने मुलांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

त्याने आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक लोकांनी आणि रुग्णांच्या नातेवाईकांच्या मदतीने दोन चोरांना पकडण्यात आले. त्यानंतर त्यांना पोलिसांकडे सोपवण्यात आले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी लोकांच्या मदतीने रुग्णालयाच्या परिसरात ठेवलेले १० ऑक्सिजन एफबीएनसी वॉर्डमध्ये नेऊन नवजात मुलांना ऑक्सिजन लावले.

या प्रकरणाची माहिती त्वरित रुग्णालय प्रशासनाला देण्यात आली. अधिकाऱ्यांनी इंजिनियर्सना घटनास्थळी बोलावत रात्रीच पाइपलाइन दुरुस्त केली. त्यानंतर पुन्हा आयसीयूमध्ये ऑक्सिजन लाइन सुरू झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!