Latest Marathi News

BREAKING NEWS

मोबाईल घ्यायचाय? Samsung, Xiaomi, Oppo मोबाईलवर बंपर ऑफर्स

0 724

मुंबई : ई-कॉमर्स कंपनी Amazon ने सध्या एक प्राईम फोन पार्टी सेल आयोजित केला आहे. मात्र हा सेल केवळ प्राइम सदस्यांसाठी असणार आहे. तो ८ फेब्रुवारीपर्यंत लाइव्ह असेल. या सेलमध्ये ग्राहकांना सॅमसंग, Xiaomi, iQOO, realme, Tecno, Oppo आणि मोठ्या प्रमाणात विकल्या जाणाऱ्या ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर ४० टक्क्यांपर्यंतची सूट मिळणार आहे.
Xiaomi Mi 12 Pro
Xiaomi प्राइम पार्टी सेल दरम्यान Mi 12 Pro ४७ हजार ४९९ रुपयांना विकत आहे. हा स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर असून यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. तुम्ही Redmi 11 Prime 5G, Redmi K50i आणि Redmi 10 Power सारखे Xiaomi मॉडेल्स सवलतीच्या दरात खरेदी करु शकता.
सॅमसंग गॅलेक्सी
या सेलमध्ये तुम्हाला सॅमसंग आपल्या एम सीरीज स्मार्टफोन्सवर उत्तम डील देत आहे. या सेलमध्ये तुम्ही Galaxy M33, Galaxy M13 आणि Galaxy M04 या मॉडेल्सना १५,३४२, रुपये ९,९२७ आणि ८,४९९ रुपयांमध्ये मध्ये खरेदी करू शकता. हे एक उत्तम असे डील तुमच्यासाठी असू शकते.
iQOO स्मार्टफोन
प्राइम फोन पार्टी सेलमध्ये iQOO आपल्या नवीन स्मार्टफोन्सवर सूट देत आहे. ज्यामध्ये iQOO Z6 Lite, iQOO Neo 6 आणि iQOO 11 5G या मॉडेलचा समावेश आहे. या मोबाईलच्या खरेदीवर iQOO Z6 Lite आणि iQOO Neo 6 अनुक्रमे १३ हजार ९८८ आणि २५ हजार ६८९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यासह iQOO 11 5G हा मोबाईल ५४ हजार ९९९ रुपयांना खरेदी करू शकता.
Realme स्मार्टफोन
Realme च्या Narzo सिरीजवर खूप आकर्षक अशा ऑफर दिल्या जात आहेत. ज्यामध्ये Realme Narzo 50, Realme Narzo 50 Pro आणि Realme Narzo 50i प्राइम यांचा समावेश आहे. हे स्मार्टफोन MediaTek Helio G96 गेमिंग प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी सारख्या फिचर्ससह मिळत आहेत. तर Narzo 50 pro आणि realme Narzo 50i Prime हे अनुक्रमे १८ हजार ४९ रुपयांना आणि ७ हजार १९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
Oppo स्मार्टफोन
प्राइम फोन पार्टी सेलदरम्यान Oppo आपल्या Oppo A78 स्मार्टफोनवर सूट देत आहे. हा स्मार्टफोन 5000mah बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे. ते Oppo F21s Pro आणि Oppo F21s Pro 5G वर देखील आकर्षक ऑफर उपलब्ध आहेत.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!