नवी दिल्ली : बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातून प्रेमप्रकरणाची एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे एका शिक्षकाचे आपल्या विद्यार्थिनीवर प्रेम जडले आणि आता दोघेही पळून गेले. सुबोध कुमार नावाचा शिक्षक 12वीच्या विद्यार्थ्याला कोचिंग शिकवत असे, त्यादरम्यान तो विद्यार्थीनीच्या प्रेमात पडला. शिक्षकाच्या प्रेमप्रकरणाला मुलीच्या कुटुंबीयांनी विरोध केला असता तो विद्यार्थिनीसह पळून गेला.
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक 25 वर्षांचा आहे, तर विद्यार्थीनी 19 वर्षांची आहे. मागील दोन वर्षांपासून ही मुलगी सुबोधकुमारकडे शिकवणीसाठी जात होती. सुबोध कुमार मझौरा येथील एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षक आहे. मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की कोचिंगमध्ये शिकवत असताना सुबोध कुमारने त्यांच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले.

मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी बारावीत शिकत असून मागील दोन वर्षांपासून ती सुबोध कुमारकडे शिकण्यासाठी जात होती. सुबोधने आपल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. प्रेमप्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी मुलीला कोचिंगला न जाण्यास सांगितले.यानंतरही आरोपी शिक्षक त्यांच्या घराभोवती फिरत असे. अनेकवेळा तो त्याच्या मित्रांसोबत घराकडे फिरतानाही दिसला आहे. मुलीच्या वडिलांनी सांगितले की, आरोपी शिक्षक घराजवळ फिरत असल्याचे पाहून त्यांनी त्याला येथे येण्यास मनाई देखील केली, परंतु त्याने ऐकले नाही.