Latest Marathi News

BREAKING NEWS

वर्ष उलटूनही ’या’ नगरपालिकेची निवडणूक नाहीच

0 31

 

बारामती : नगरपालिकेची मुदत संपून आता एक वर्षांचा कालावधी उलटून गेल्यावरही अजूनही नगरपालिका निवडणूकांबाबत संदिग्धताच असल्याने लोकप्रतिनिधींचा कारभार नेमका केव्हा सुरु होणार या बाबत बारामतीकरांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. बारामती नगरपालिकेची निवडणूक डिसेंबर 2016 मध्ये झाली. नवीन नगरसेवकांनी फेब्रुवारी 2017 मध्ये पदभार स्विकारला. या सदस्यांची मुदत फेब्रुवारी 2022 मध्ये संपुष्टात आली. त्या नंतर मुख्याधिका-यांना राज्य शासनाने निवडणूक होऊन नवीन सदस्य येईपर्यंत प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.

Manganga

निवडणूका होतील असे वाटत असताना अनेकदा विविध कारणांमुळे राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलल्या गेल्या. तब्बल वर्षभर बारामतीत मुख्याधिकारीच प्रशासक म्हणून नगरपरिषदेचा कारभार पाहत आहेत.

बारामती नगरपालिकेत राष्ट्रवादीचे वर्चस्व असते, विरोधी पक्षनेते अजित पवार दरवर्षी काही नवीन तर काही जुने चेहरे असे समीकरण जुळवत असतात, त्या मुळे जुन्या नगरसेवकांना पुन्हा संधी हवी आहे तर काही नवीन कार्यकर्त्यांनाही नगरसेवक म्हणून काम करण्याची इच्छा आहे. काही जण आपल्याला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी द्यावी अशा आशा लावून बसलेले आहेत.
नगरपालिकांच्या बैठकांमधून होणा-या चर्चा, नागरिकांचे मांडले जाणारे प्रश्न, विकासकामे वेळेत पूर्ण होण्यासाठी भांडणारे नगरसेवक,अनेकदा प्रशासनाला विविध कारणांवरुन धारेवर धरणारे अभ्यासू नगरसेवक व त्यांच्या अभ्यासपूर्ण चर्चा असे चित्र गेल्या वर्षभरात पाहायलाच मिळाले नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!