Latest Marathi News

BREAKING NEWS

वडिलांनी आगीत होरपळत मुलांचा वाचवला जीव

0 40

 

 

नाशिक: रात्री च्या सुमारास गॅरेज मध्ये काम करत असताना अचानक लाईट गेल्याने मेणबत्ती पेटवून तिच्या प्रकाशात काम करत असताना मेणबत्ती खाली पडल्यानंतर जवळच असलेल्या थीनरने पेट घेतल्याने गॅरेज मालकाचा मृत्यू झाल्याची घटना अंबड परिसरात घडली आहे.

Manganga

याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक १ फेब्रुवारी बुधवार रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास कृष्णा राजकुमार विश्वकर्मा हे त्यांच्या घराजवळील त्यांच्याच स्वतःचे वा.सु. विश्वकर्मा मोटर्स ह्या गॅरेज मध्ये काम करत असताना लाईट गेल्यामुळे गॅरेज मध्ये मेणबत्ती लावून त्यांचे काम चालू असताना मेणबत्ती खाली पडल्याने खाली असलेल्या थिनरने पेट घेतला यात कृष्णा विश्वकर्मा हे मोठ्या प्रमाणात भाजून जखमी झाले होते.

प्रसंगी त्यांचे दोघे मुले देखिल यावेळी गॅरेज मध्येच होते. वडिलांच्या कपड्यांनी घेतलेला पेट लक्षात घेऊन त्यांनी वडिलांजवळ जाण्यासाठी सुरुवात केली. परंतु बापाचे काळीज ते, इतक्या भीषण प्रसंगी सुद्धा दोघे चिमुकले आपल्या जवळ आहे तर त्यांना देखिल दुखापत होईल म्हणून कृष्णा विश्वकर्मा यांनी दोघ मुलांना स्वतःपासून दूर ढकलून देत स्वतःच आग विझावण्याचा प्रयत्न करू लागले.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आग विझवत पुढिल उपचारासाठी त्याचा भाऊ पिंटु राजकुमार विश्वकर्मा याने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याच्यावर उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मालावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!