मुंबई: कधी नोकरीचे आमिष दाखवून कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करत त्यांना भेटायला बोलवायचे आणि मग सुरू होतो एक भयानक खेळ मुलींचे अपहरण करायचे लग्नासाठी मुलगी हवी असलेल्या कुटुंबाला त्यांची विक्री करायची आणि बळजबरीने तिचे लग्न लावायचे मुंबईत आणि महाराष्ट्रात अशी अंगावर काटा आणणारी प्रकरणे उघडकीस आली आहेत.

लासोपारा येथील अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियावर मैत्री केली. स्वत:ला सैन्यदलातील अधिकारी असल्याचे सांगत तिला भेटायला बोलावले आणि तिचे अपहरण करत राजस्थानमध्ये तिला लग्नासाठी विकले गेले. कुरारमधील मुलीला राजस्थानमध्ये मोठा इव्हेंट असल्याचे सांगत केटरिंगच्या कामासाठी नेले आणि अपहरण केले. शाळकरी मुलीला नशेचे डोस देऊन तिची राजस्थानमध्ये विक्री करणे असो या सर्व प्रकरणांत एक समान धागा आहे.
न्यायचे. वेश्या व्यवसायात ढकलण्याची धमकी देऊन तिचे शोषण करायचे आणि लग्नासाठी मुलगी हवी असलेल्या एखाद्या कुटुंबाला बळजबरीने तिला विकायचे. खरेदी-विक्री होणाऱ्या या मुलींना स्थानिक भाषेत ‘पारो’ म्हटले जाते. लाख-दोन लाखांत एजंटांकडून त्यांना खरेदी केले जाते. लग्नासाठी मुलगी न मिळणाऱ्या तरुणाशी तिचे लग्न लावून दिले जाते.
मुलींना फसविण्याचे असेही रॅकेट
– एजंट, सोशल मीडियावर बनावट प्रोफाईल तयार करतात. ते अकाऊंट खूप काळापासून ॲक्टिव्ह असल्याचे दाखवितात. मग सुरू होतो खेळ.
– देशातील वेगवेगळ्या शहरांतील सुंदर मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची. मैत्री करायची, भेटायला बोलवायचे. काहींना नोकरीचे आमिष दाखवायचे, अपहरण करून त्यांना विकायचे.
– काही एजंट तर गरीब मुलींशी लग्न करून त्यांना राजस्थान किंवा हरयाणाला घेऊन जातात आणि त्यांची विक्री करतात, त्यांचे बळजबरीने लग्न लावून देतात.