नवी दिल्ली – आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील अमदलावालामधील मंडाडीमध्ये एक भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या घटनेत ट्रकने कामगारांना चिरडले. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. पोलिस अधिकारी कृष्णा यांनी सांगितले की, इतर कामगारांची तब्येत गंभीर आहे. ट्रक चालकाच्या म्हणण्यानुसार ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना घडली.

ट्रक चालकाने पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे. तर पोलिस या अपघाताची कसून चौकशी करत आहेत. हा अपघात शनिवारी रात्री घडली. विजयनगरम येथून काशी शहराकडे ट्रक निघाला होता. यावेळी रस्त्यावर किमान २०० कामगार चालत होते. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला.