पुण्यात डेटिंग सर्व्हिसच्या नावाखाली 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करण्यात आली आहे. के. बी. टेलीकॉम या डेटिंग सर्व्हिस कंपनीच्या नावाखाली २ सायबर चोरट्यांनी तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. रजत सिन्हा, नेहा शर्मा तसेच इतर बँक खात्यात ज्यांना हे पैसे ट्रान्सफर झाले आहेत. अशा लोकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

78 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीने या संदर्भात पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांना नेहा शर्मा या नावाच्या व्यक्तीने एके दिवशी फोन आला. त्या व्यक्तीने त्यांची के.बी. टेलीकॉम ही डेटिंग कंपनी आहे असे सांगितले आणि आम्ही ज्येष्ठ नागरिकांना डेटिंग सर्व्हिस देतो असे सांगितले.
फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन आरोपीने डेटिंग सर्व्हिस देण्यासाठी त्यांच्याकडून सुरुवातीला काही पैसे ऑनलाईन भरा असे सांगितले. यानंतर देखील वेग वेगळी कारणे सांगत त्यांच्याकडून आरोपी यांनी पैसे उकळले. यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना धमकी देण्यास सुरुवात केली. तुम्ही बेकायदेशीरपणे डेटिंग सर्व्हिस घेण्याचा प्रयत्न केलाय, आता तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, समाजात बदनामी होईल, अशा धमक्या त्यांना येऊ लागल्या. पोलिसांकडून हे बँक खाते गोठवले असून, आरोपींचा शोध सुरू आहे.