Latest Marathi News

BREAKING NEWS

पद्मभूषण पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध गायिका यांचे निधन

0 215

 

संगीत जगतातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. पद्मभूषण पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांचे निधन झाले आहे. त्या ७७ वर्षांच्या होत्या. चेन्नईतील त्यांच्या निवास्थानी वाणी या मृतावस्थेत आढळून आल्याचे थाउझंड लाइट्स पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत अधिकचे तपशील अद्याप समोर आलेले नाही.

Manganga

वाणी जयराम यांचे निधन नक्की कशामुळे झाले याबाबतअद्यप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. वाणी जयराम यांना याच वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वाणी यांच्या अकस्मित निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला असून, यामुळे संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

वाणी जयराम यांनी नुकतीच व्यावसायिक गायिका म्हणून संगीत क्षेत्रात ५० वर्षे पूर्ण केली होती. वाणी यांनी त्यांच्या कारकिर्दीत १०,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत. वाणी जयराम यांनी आरडी बर्मन, केव्ही महादेवन, ओपी नय्यर आणि मदन मोहन यांच्यासह अनेक प्रसिद्ध संगीतकारांसोबतही काम केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!